मकर संक्रांत का साजरी करतात

सणांना धर्माचा, ग्रंथाचा आधारावर साजरे केले जातात. या मधील अनेक सण हे मौसमी स्वरूपात पंचागाला अनुसरून असतात. मकर संक्रांती हा सण सर्व राज्यामध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक स्वरूपात साजरा केला जातो. मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मातील सूर्य देवाला समर्पित असून सूर्यदेव हे वैदिक ग्रंथाचे देवत आहे. हिंदू मान्यतेनुसार, या दिवसा पासून पौष महिना संपल्यामुळे शुभ कार्य पुन्हा सुरु केली जातात. तसेच मकर हा शब्द “राशीला” तर संक्रांति “संक्रमण” असेही संबोधित करतो. ह्या दिवशी पासून सूर्य धनु राशी पासून मकर राशीत संक्रमित होत असल्याने या वेळेला मकर संक्रांति म्हणतात.

पश्चिम भारतात मकर संक्रांत सर्वात लोकप्रिय आहे, तर दक्षिणेकडे, हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो आणि उत्तरेला तो लोहरी म्हणून साजरा केला जातो. उत्तरायण, माघी, खिचडी ही याच सणाची आणखी काही नावे आहेत. मकर संक्रांत हा शांती आणि समृद्धीचा काळ मानला जातो.

मकर संक्रांतीशी संबंधित सण विविध नावांनी ओळखले जातात .

राज्यसणांचे नाव
आसाममाघ बिहू
पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमाघी (लोहरी चा आधी  साजरा केला जातो)
मध्य भारतसुकरत
तामिळनाडूपोंगल, उझवर तिरूनल
गुजरातउत्तरायण
ओडिशा,कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगालमकर संक्रांती ( पौष संक्रांती )
उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशखिचडी संक्रांती , घुघुटी
आंध्र प्रदेश, तेलंगणासंक्रांती
नेपाळमाघे संक्रांती
थायलंडसोंगक्रान
म्यानमारथिंगयान
कंबोडियामोहन सोंगक्रान
काश्मीरशिशूर संक्रांती

तसेच आंध्रप्रदेशात “मकर संक्रांती ” हा खास उत्सव तीन दिवस चालतो. लोक पौराणिक कथा मधील पात्रा प्रमाणे स्वतःला सजवतात. पहिला दिवस म्हणजे भोगी पांडुगा, जेव्हा लोक भोगी (Bonfire) मध्ये जुन्या वस्तू जाळतात. दुसरा दिवस म्हणजे पेड्डा पांडुगा हा संक्रांती चा दिवस असतो. जेव्हा मोठा उत्सव होतो. प्रार्थना, नवीन कपडे आणि मेजवानी साठी अतिथींना आमंत्रित करून साजरा केला जातो. तिसरा दिवस कनुमा पांडुगा लोक शेवटचा दिवशी मांसाहार करतात.

लोहरी हा सण संक्रांतीचा एक दिवस अगोदर साजरा केला जातो. लोहरी हा हिवाळाचा शेवट दर्शवतो. मकर संक्रांतीला महराष्ट्रात तर लोहरीला प्रामुख्याने पंजाब, जम्मू आणि हिमालय प्रदेशाशी जोडतात. लोहरी हा सण लोक लोकगीते गाऊन, शेकोटी पेटवून, रेवडी – शेंगदाण्या सारखे पदार्थ खाऊन साजरा करतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा शुभ काळ सुरू होतो. संक्रांतीच्या दिवशी भक्त भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचीही पूजा करतात. मकर संक्रांती हा भारतभर साजरा केला जाणारा वर्षातील पहिला मोठा सण आहे.

मकर संक्रांति हे शुभ कार्याचे प्रतीक मानून सदभावनेने तिळ गुळांची देवाण घेवाण “तीळ गुळ घ्या गोड गोड बोला” म्हणजेच मिठाई चा स्वीकार करा  आणि गोड संबध प्रस्तापित करा असा शब्द प्रयोग करून केली जाते. ह्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्या चे प्रतीक म्हणून एकमेकांना भेट वस्तू देतात. भेटवस्तू देण्याची पद्धत ही प्राचीन काळा पासून चालत आली असून आशीर्वाद स्वरूपात त्याचा स्वीकार केला जातो.

मकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठी नाही तर या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची परंपरा देखील आहे. पतंग उडवणे हा या उत्सवातील विधी आहे. प्रत्येकजण मुले किंवा तरूण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. सकाळपासूनच आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग दिसतात. बर्‍याच ठिकाणी भव्य पतंगोत्सव देखील आयोजित केला जातो आणि स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. पतंग उडवण्यासाठी गुजराती लोक ह्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात .उत्तरायणासाठीचे पतंग विशेष हलक्या वजनाच्या कागदाचे आणि बांबूचे बनलेले असतात.

Add a Comment

Your email address will not be published.