किस दिशा में क्या होना चाहिए वास्तु अनुसार

“गृहस्थस्य क्रियास्सर्वा न सिद्धयन्ति गृहं विना।“

घरा शिवाय एका गृहस्थ माणसाची कामे पूर्णत्वास जाऊ शकत नाही. असं जरी मानल्या गेलं तरी पण काय आहे हे वास्तू शास्त्र.

वास्तुशास्त्र म्हणजे काय हेच नेमके लोकांना माहिती नसल्याने काहीतरी फार प्राचीन आणि फार मौल्यवान शास्त्र असा समज वाढला आहे.

एका सोप्या शब्दात मांडल्या गेलं म्हणजे वास्तू स्थितीला जपणारी आपली मनस्थिती. म्हणूनच वास्तू तथास्तु असं आपण म्हणतो.

वास्तू म्हणजे घर किंवा सदन आणि शास्त्र म्हणजे विज्ञान किंवा नियम. हिंदू कथा पुराणामध्ये वास्तूला खूप महत्व देण्यात आलेलं आहे. वास्तू कुठे बांधावी, त्याचा नकाशा, त्याची दिशा याची नियमावली यात शास्त्रीय पद्धतीने मांडली जाते.

वास्तू - तथास्तु

वास्तू शास्त्र म्हणजे आठ दिशा आणि पाच पंचमहाभूत यांच्याबद्दलचे शास्त्र. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, पाणी , हवा ,अग्नी , आकाश . आपल्या जीवनातील बराच गोष्टी या दिशा आणि पंच महाभूतांवर अवलंबून असतात. हि पंच महाभूते सुख आणि शांतीला आकर्षित करत असतात.

वास्तू मध्ये सुख आणि समृद्धी साठी काही विशिष्ट दिशांना_ विशिष्ट बांधकाम करावे लागते. जागेचा आकारा पासून तर स्वयंपाक घर कुठल्या दिशेने असावे , शयन कक्ष कुठल्या दिशेने असावे, घरात कुठल्या गोष्टी असाव्यात किंवा कुठल्या गोष्टी नसाव्यात या सर्व गोष्टींची ईतभूत माहिती या शास्त्रा मध्ये दिली आहे.

वास्तू शास्त्राचा जन्म भारतात झालेला आहे. वास्तू शासत्रा मध्ये  आपली संस्कृती , परंपरा , भौतिक घटक आणि ग्रंथाचा देखील समावेश आहे.

हे शास्त्र केवळ घराचा बांधकाम पुरतेच मर्यादित नसून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा या साठी सुद्धा महत्व पूर्ण ठरते.

दिशा_ या शास्त्रामध्ये कुठल्या दिशेला काय असावे हे सांगितले जाते . शिवाय मुख्य प्रवेश कुठल्या दिशेला असावा आणि कुठला दिशेला काय निर्मिती करावी हे सांगितले जाते. तसेच कुठल्या वस्तूची निर्मिती करायची आहे या साठी विशिष्ठ जागेची निवड केली जाते. जागेचा आकार, सभोवतालचे वातावरण ह्या सर्व गोष्टी बघितल्या जातात. वास्तूचा आतील सजावट या मध्ये सुद्धा भर दिली जाते .

त्याचे परिणाम सांगायचे झाले तर ..

  • वास्तू मध्ये सुख शांती निवास करते
  • वास्तू मधील व्यक्तींना चांगले आरोग्य लाभते .
  • व्यापारात , उद्योगात , कारकिर्दीत यश मिळते .
  • घरा मध्ये व्यावहारिक तसेच मानसिक सकारात्मकता लाभते.
  • नाते संबध घट्ट होतात , टिकून राहतात .
  • सर्वी कडे आनंदाचे आणि हर्षोलासाचे वातावरण राहते.

वास्तू शास्त्रामध्ये “वास्तू पुरुष” ह्या एका विषयात पण भर दिला जातो. ब्रह्माजींनी महाभूतांना वास्तुपुरुष म्हटले असे विश्वकर्मा प्रकाशात म्हटले आहे. भाद्रमासातील कृष्ण पक्षाची तिसरी तिथी, शनिवार, कृतिका नक्षत्र, व्यतिपात योग, कुलिका मुहूर्तामध्ये भगवान शंकराच्या घामाच्या थेंबापासून त्यांची उत्पत्ती झाली. वास्तू शास्त्रा नुसार वास्तू पुरुष जमिनीवर खालचा दिशेने स्थित आहे . म्हणजेच त्याचे तोंड जमिनीचा खालचा दिशेने आणि पाठ वर आहे. डोकं ईशान्य म्हणजेच उत्तर – पूर्व  दिशेला असून पाय नैऋत्व म्हणजेच दक्षिण_पश्चिम दिशेला आहे. ह्या वास्तू मंडळात ज्याचे नियंत्रण आहे त्या निराकाराचा वास्तू पुरुष असे म्हणतात.

वास्तू शास्त्र खरच प्रभावी आहे का असा खूप लोकांना प्रश्न उदभवतात. खर तर हे आपल्या मान्यते वर आहे . तुमचा वैचारिक शक्तीवर परिपूर्णतेणे याचे सामर्थ्य टिकून आहे.

प्रत्येक निर्मिती साठी वास्तू शास्त्र आवश्यकच आहे अशे नाही , परंतु वास्तू मध्ये सुख आणि समृद्धीसाठी वास्तू शास्त्राची गरज असते.

2 Comments

Add a Comment

Your email address will not be published.