स्वप्न शास्त्र शुभ कि अशुभ |अगर आते हैं आपको ये तीन सपने तो समझें कुछ होने वाला है अशुभ

To imagine something that you would like to happen.

कुणी कल्पना तर कोणी संकेत म्हणून गृहीत धरलेलं विज्ञान म्हणजे स्वप्न शास्त्र. स्वप्न का येतात ती कशी दिसतात त्याच प्रमाण काय? व्यक्तीच्या जीवनात त्याचा काय प्रभाव आहे ह्या सर्व गोष्टी यात मांडल्या गेल्या आहेत.

खरंतर वैज्ञानिक दृष्ट्या स्वप्न फक्त त्याच गोष्टी दर्शवितात जास्त विचार किंवा कल्पना आपण आपल्या मनात करतो. पण काही गोष्टी कल्पनेच्या पलीकडे असतात आणि मग त्या शास्त्रा सोबत जोडल्या जातात.

स्वप्न खूप प्रकारची असतात. त्यात काही भूतकाळ तर काही भविष्यकाळाशी निगडीत असतात.

स्वप्न शास्त्र

स्वप्न विज्ञान:

काही स्वप्ने पूर्वाभास करून देतात असे अनुभव कित्येक लोकांचे आहेत. अनेकदा रात्री झोपेत आपल्याला स्वप्न दिसतात आपल्यापैकी बहुतेकांना स्वप्नात याच गोष्टी दिसतात ज्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यात घडत असतात.

स्वप्नात कोणते मंदिर किंवा देव दिसत असेल तर धार्मिक दृष्ट्या त्याचे काही शुभ किंवा अशुभ परिणाम आणि कारण दोन्ही सांगितले गेलेले आहे.

स्वप्न शास्त्रात स्वप्नाचा अर्थ  सांगितला गेला आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात कोणतीही देवता दिसली तर त्याचे वेगवेगळे अर्थ आहे.स्वप्नात कुठले देव पाहिले तर काय अर्थ आहे ते म्हणजे असे.

गणेश:

आपण सर्व नेहमी स्वप्न बघतो काही स्वप्नांचा अर्थ हा वेगळा होतो जर तुम्ही स्वप्नात आपल्या लाडक्या बाप्पांना बघितले असेल तर त्याचा काय बोध होतो, जर स्वप्नात तुम्ही गणेश मूर्तीचे दर्शन करता ती  स्वप्ने खूप शुभ फळ प्राप्त करते याचा अर्थ तुम्हाला लवकरच काही शुभ बातमी मिळणार आहे तुमच्या घरी काही मांगलिक कार्य घडणार आहे. अशे स्वप्न दिसल्यानंतर गणेशाचे स्मरण आणि दर्शन नक्की घ्या तसेच बाप्पांचे पाठीचे दर्शन करणे किंवा दिसणे शुभ नसते.  म्हणजेच अशा परिस्थितीत तुम्हाला आर्थिक नुकसान ना समोर जावे लागू शकते.

शिव:

जर तुम्हाला स्वपनात शिवमंदिर किंवा एखाद्या मंदिरात जात आहे असे दिसले हे फार शुभ असल्याचे म्हटले जाते असे स्वप्न तुमच्या गंभीर अडचणी किंवा आजारातून मुक्तता होईल याची ग्वाही देते स्वप्न शास्त्रानुसार जर महादेव तांडव करताना दिसेल तर असे स्वप्न अशुभ नसून लवकरच तुमची शत्रूपासून होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळेल याचे संकेत सांगते तसेच शिवपार्वती सोबत दिसली तर समजून घ्या की तुमच्यावर त्यांची विशेष कृपा आहे वैवाहिक जीवनात येणारे मतभेत अडचणी लवकर संपेल तसेच स्वप्नात साप आणि त्रिशूळ दिसणे लाभदायक समजले जाते.

स्वप्नात साप आर्थिक लाभ होण्याचे संकेत सुचविते तर त्रिशूल संकटाचा विनाश होण्याचे.

राधा- कृष्ण :

 राधा- कृष्ण प्रेमाचे प्रतीक असून तर जर तुम्ही स्वप्नात राधा- कृष्ण यांना सोबत बघत असाल तर हे शुभ समजल्या जाते. लवकरच तुम्हाला तुमचा प्रेमात आनंद आणि सफलता लाभण्याचे संकेत मिळते . तसेच योग्य जोडीदार मिळण्याचे सूचक मिळते आणि  प्रेम विवाह निर्विघ्न पद्धतीने पार होतो.

हनुमान:

स्वप्नात हनुमानजी आले असतील तर श्रद्धेनुसार याचा अर्थ असा सांगण्यात येतो कि सेवेकऱ्यांना दीर्घायुष्य लाभेल. शत्रू वर विजय मिळेल. रोगातून लवकरच बरे व्हाल.

माता लक्ष्मी:

स्वप्नात माता लक्ष्मी दिसण्याला फारच शुभ मान्यता दिली आहे. स्वप्नामध्ये श्रीमंतीची लक्ष्मी बघणे म्हणजे आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीची नवी वाटचाल येण्याची संभावना सुचविते. लक्ष्मी नारायण सोबत दिसणे हे पण तेवढेच शुभ फळ देते. कुटुंबिक सुख शांती आणि भरभराटीच आयुष्य हि कल्पना यात सांगितली जाते.

शनी देव:

शनी महाराजांविषयी सर्वांचा मनी नेहमी भीतीचे वातावरण बघितले जाते. शनिदेवांचा कोप टाळण्यासाठी खूप लोक त्यांना तेल चढवणे, प्रत्येक शनिवार ला मंदिरात जाताना दिसतात. शनी देवांनी स्वप्नात दर्शन दिले तर लोक संकोच करतात.

शनी देव स्वप्नात दिसणे – शुभ तसेच अशुभ असे दोन्ही संकेत देतात.आणि हे पूर्णपणे स्वप्नावर निर्भर असते.

शनी देव स्वप्नात दिसणे त्यांची पूजा करणे त्यांना तेल चढवणे शुभ मानले जाते. पण शनी देव कावळ्यावर बसून दिसले तर ते स्वप्न अशुभ फळ देते. त्या व्यक्तीचे जीवन अशांत होण्याचे संकेत भासते.त्यांचा जीवनात शांतीचा भंग होतो. अशे स्वप्न म्हणजे परिवारात मतभेद जाणवतो.

माता काली :

माता कालीला माता पार्वतीचे रूप म्हटल्या गेले आहे. काली मातेला वाईट शक्तीचा विनाश करणारी देवी असे सुद्धा मानल्या जाते.स्वप्नात काली माता दिसणे खुप शुभ मानल्या जाते.स्वप्न शास्त्रा नुसार स्वप्नात काली देवी बघणे म्हणजे नकारात्मक शक्तीचा विनाश देखील मानल्या जाते. जर तुम्ही आजारी आहे तर हे स्वप्न रोग मुक्तीची संभावना दर्शवतो.याचा व्यतिरिक्त अशी स्वप्ने कौटुंबिक सुख शांती सुद्धा दर्शविते.

स्वप्नात काली मातेची मूर्ती दिसणे अत्यंत शुभ मानले गेले आहे याचाच अर्थ तुमचा आत्मविश्वास मध्ये वाढ संभवते.

परंतु स्वप्नात काली देवी रोद्र रूपात दिसणे म्हणजेच येणाऱ्या काळात तुम्हाला अत्याधिक संघर्ष करावे लागू शकतात पण शेवटी विजय तुमचाच होईल.

स्वप्नात काली मातेचे मंदिर दिसणे तसेच त्यांची पूजा करताना दिसणे शुभ मानल्या गेले आहे याचाच अर्थ असा कि लवकरच तुम्हाला शुभ समाचार मिळू शकते तसेच धन लाभ सुद्धा होऊ शकते.

Add a Comment

Your email address will not be published.